“पहिलं प्रेम आईने मिळवून दिलं पण…” अक्षय केळकरने सांगितला ब्रेकअपचा किस्सा

मुंबई : मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षय केळकर सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाला आहे. मूळचा मुंबईचा असलेला अक्षय एका सामान्य कुटुंबातून आला आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री करतानाच त्याने त्याचा आतापर्यंतचा प्रवास सर्वांना सांगितलं होता. अक्षयचे वडील आजही रिक्षा चालवतात. नुकताच बिग बॉसच्या घरात अक्षयने त्याच्या ब्रेकअपचा किस्सा शेअर केला आणि त्याचवेळी आई- वडिलांचा अभिमान का वाटतो याचं खास कारणही सांगितलं.

अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात त्याचं पहिलं प्रेम त्याच्या आईने त्याला कसं मिळवून दिलं होतं हे सांगितलं. त्याचबरोबर ब्रेकअपचा किस्साही शेअर केला. अक्षय केळकरला नात्यातीलच कोणी एक मुलगी मेसेजेस पाठवत होती जे त्याच्या आईच्या निदर्शनास आले आणि त्याचबद्दल अक्षयने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना किस्सा सांगितला.


अक्षय म्हणाला, “मी सुरुवातीला खूप लाजत असे. मुलींशी फारसा बोलत नसे आणि नात्यातली एक मुलगी मला मेसेज करत होती. मी ते मेसेजेस इग्नोर केले. त्यावेळी आई माझा फोन चेक करायची आणि आईने मात्र सांगितले कि, मुलगी तुला मेसेज करत आहे, तिला तू आवडत असावास. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो. आमच्यात बरीच चर्चा झाली. तिने मी तिला आवडत असल्याची कबुली दिली. सगळं छानचं होतं. पण ते प्रेम टिकलं नाही. ब्रेकअप झाला. पण माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईने जुळवून दिलं होतं.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने