“त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

 मुंबई : अभिषेक बच्चनचं वडील अमिताभ बच्चन यांच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. एखादी संधी मिळाली की तो वडिलांबाबत भरभरून बोलताना दिसतो. यावरूनच तो वडिलांचा किती आदर करतो हे दिसून येतं. ‘केस तो बनता है’ या शोमध्ये अभिषेक बच्चनने हजेरी लावली होती. कॉमेडी ड्रामा असलेल्या या शोमध्ये वडिलांबाबत जे काही बोललं गेलं ते अभिषेकला आवडलं नाही. चक्क शो सुरु असताना तो तिथून निघून गेला.

रितेश देशमुख, परितोष त्रिपाठी व कुशा कपिलाचा ‘केस तो बनता है’ शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेकबरोबर सगळेच मजा-मस्ती करताना दिसत आहेत. परितोष आपल्या विनोदी शैलीने सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे सगळं सुरु असताना अभिषेकला राग अनावर होतो आणि तो शोमधून निघून जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.अभिषेक म्हणतो, “हे खूप जास्त होत आहे. माझ्याबद्दल बोला पण माझ्या पालकांना मध्ये घेऊ नका. तसेच वडिलांना इथे मध्येच का आणायचं? ते माझे वडील आहेत. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. विनोदाच्या नावाखाली आपण सध्या हवं ते करतो. पण मी मुर्ख नाही.” असं म्हणत अभिषेक शो सोडून निघून जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने