काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; वाचा, शोपियानमध्ये नेमकं काय घडलं.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शोपियांच्या चौधरीगुंडमध्ये एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पूरण कृष्ण भट असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, घटनेनंतर भट यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. याआधी ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिनी खोऱ्यात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमुळे चिडलेल्या दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांची गोळ्या झाडून हत्या केली होती. खोऱ्यात वाढत्या काश्मीरी पडितांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आज घटलेल्या घटनेमध्ये अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नसून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने