सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान मिळाला असता पण ...

मुंबई : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे. सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. सरदार पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यात अभूतपूर्व योगदान दिले होते. हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या स्वतंत्र भारतातील पहिले पंतप्रधान म्हणून सरदार पटेल यांच्याकडे पाहिले जात होते. पण, असे काय घडले की त्यांना हा मान मिळाला नाही. ते या लेखात जाणून घेऊया.

भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल यांना सर्वजण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण खूप उशिरा सुरू झाले. तरुण होईपर्यंत ते आपल्या घरीच वडिलांना शेती कामात मदत करत असत. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर आईचे नाव लाडबा असे होते.सुरूवातीपासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. त्यामुळेच राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते.म सरदार पटेल पंतप्रधान व्हावेत अशी काँग्रेसमधील प्रत्येकाच नेता आणि कार्यकर्त्याची इच्छा होती, पण गुरूस्थानी मानलेल्या महात्मा गांधींजींच्या सांगण्यावरून सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका

भारताला स्वातंत्र्य लढ्य़ात वल्लभभाई पटेल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यासह लोकांमध्ये दारूबंदी, अस्पृश्यता आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढ्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. हिंदू-मुस्लिम ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटीशांशी दोन हात करताना ते अनेकवेळा तुरुंगात गेले पण सरदार पटेलांच्या जिद्दीपुढे ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले.

तर पटेल स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते

देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्य़ा हालचाली सुरू झाल्या. नवे सरकार स्थापन करून देशाला उभारी देण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटीबद्ध होता. त्यामुळे काँग्रेसचे नवे अध्यक्ष पटेल हेच देशाचे पहिले पंतप्रधान होतील अशी आशा प्रत्येकाची होती. पण, झाले उलटेच.सरदार पटेलांच्या लढावू वृत्तीमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रीय होते. त्यामुळे काँग्रेस समितीने सरदार वल्लभभाई पटेल यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड केली. भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनाही अध्यक्षपदाची संधी होती. पण, नेहरू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला नाही आणि पटेल पूर्ण बहुमताने पक्षाचे अध्यक्ष बनले. परंतु यामुळे पक्षात फूट पडेल या भीतीने महात्त्मा गांधीजींनी सरदार पटेलांना माघार घेण्यास सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने