उद्धव ठाकरे 'ऑन फिल्ड'! मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानीची करणार पाहाणी

मुंबईः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालेलं आहे. याची पाहाणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत.मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परंतु शेतकऱ्यांना ठोस मदत झाली नाही. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.उद्या सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे औरंगाबादकडे निघतील. या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नुकसानीची पाहाणी करुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची ते मागणी करु शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने