आल्याआल्या काढली किरण मानेची खरडपट्टी, स्नेहलता ठरणार सर्वांवर भारी!

मुंबई : काल बिग बॉसच्या घरातले तिसरे एलिमिनेशन झाले. योगेश जाधव ने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्याच्या शिव्या आणि त्याची अर्वाच्य भाषा यामुळे तो त्याला घराबाहेर पडावे लागले. कालच्या एलिमिनेशन नंतर खरं तर घरात 13 सदस्य उरणार होते पण बिग बॉस ने एक मोठा गेम केला आणि अचानक एक वाइल्ड कार्ड सदस्य घरात आणला.काल बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री झाली. अत्यंत दमदार अशी एंट्री घेत अभिनेत्री स्नेहलता वसईकरने बिग बॉसच्या घरात पाय ठेवला. स्नेहलता वसईकर ही नाव अभिनय क्षेत्रात प्रचंड मोठं आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट आपल्या अभिनयाने अजरामर केले आहेत. टी अभिनयात जितकी सरस आहे तितकीच ती कणखर आणि स्पष्टवक्ती आहे. त्यामुळे ती या घरात राडा घालणार यात शंका नाही. कारण त्याची प्रचिती कालच आली.


कालच्या भागात तिची एंट्री होताच बिग बॉस ने एक गेम खेळला. तो गेम असा होता की स्नेहलताने प्रत्येक स्पर्धकाविषयी आपले मत व्यक्त करायचे, जो चांगला खेळतो त्याच्या नावाचे कटआऊट काठावर ठेवायचे तर जो वाईट आहे त्याचे कटआऊट पाण्यात टाकायचे. या टास्क मध्ये स्नेहलताने सगळ्यांविषयीच आपले परखड मत मांडले. पण किरण मानेवर मात्र ती चांगलीच भडकली.किरण माने ही सतत त्याच त्या चुका करतात, त्यांचा दृष्टिकोन अत्यंत घाणेरडा आणि विकास चा ते वापर करतायत यावर तिने किरणची चांगलीच खरडपट्टी काढली. एवढेच नाही तर तुला एकदा नाही तर दहा वेळा पाण्यात बुडवून वर काढायची गरज आहे, असंही टी म्हणाली. तिच्या या विधानाने मांजरेकरसुद्धा अवाक झाले. अशी दमदार एंट्री घेतल्यानंतर आता घरात ती काय हंगामा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने