खोक्यांसाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील मविआमधील काही नेत्यांची सुरक्षा काढली आहे. तर काही नेत्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली ते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच बंडखोर आमदारांचीही सुरक्षा कायम ठेवली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला आहे. 50 खोके सुरक्षित ठेवण्यासाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? असा प्रश्नही एकनाथ खडसे यांनी केलाय.


महाविकास  आघाडीच्या 40 नेत्यांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली आहे. परंतु ज्यांनी 50 खोके घेतले, त्या खोकेवाल्यांची सुरक्षा का नाही काढली? 50 खोके सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली आहे का? असा प्रश्नही एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढणे आणि दुसरीकडे बंडखोर आमदारांची सुरक्षा ठेवणे हा राजकीय सुडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने