पाकिस्तान सर्वाधिक धोकादायक देशांपैकी एक; जो बायडेन यांचं विधान.

वाशिंगटन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानविषयी मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानने जगभरात सर्वाधिक धोकादायक देशांपैकी एक असल्याचं बायडेन यांनी म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानकडे कोणत्याही सामंजस्य कराराशिवाय आण्वीक शस्त्रे असल्याचं म्हटलं आहे. 


अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी लॉस एंजिल्स (कैलिफोर्निया) मध्ये एक डेमोक्रेटिक काँग्रेस कमेटीच्या रिसेप्शनमध्ये हे विधान केलं. यावेळी त्यांनी चीन आणि रशिया देशांना देखील फटकारलं.अमेरिकेचे चीन आणि पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधावरून बोलत असताना बायडेन यांनी पाकिस्तानबाबत हे विधान केलं. तसेच पाकिस्तान सर्वाधिक धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने