“लग्न कधी करणार?”, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर यामी गौतमचं भन्नाट उत्तर, पतीबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

मुंबई: अभिनेत्री यामी गौतम बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. यामीने दिग्दर्शक आदित्य धरसह जून २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नासाठी केलेल्या पारंपरिक वेशातील फोटो यामीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही केले होते. परंतु, तरीदेखील यामीच्या एका चाहत्याला ती लग्न कधी करणार असा प्रश्न पडला आहे.यामीने काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरुन तिच्या चाहत्यांसाठी ‘Asked me anything’ सेशन अरेंज केलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी यामीला तिच्या आगामी चित्रपटापासून ते आवडीनिवडीबाबत अनेक प्रश्न विचारले. यामीच्या एका चाहत्याने तिला तिच्या लग्नाबाबतही प्रश्न विचारला. चाहत्याने “तुम्ही लग्न कधी करणार?”, असा प्रश्न विचारला. चाहत्याचा हा प्रश्न वाचून यामीही आश्चर्यचकित झाली. यामीने तिच्या लग्नातील फोटो पोस्ट करत या चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर दिलं.

यामीच्या या ट्वीटवर अनेकांनी मजेशीर कमेंट करत रिप्लाय केला आहे. “हा काय प्रश्न आहे”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने “डीपी बघूनच समजून जायला हवं होतं”, असं म्हटलं आहे. “अद्भुत व्यक्तींचे प्रश्न”, अशी कमेंटही एकाने केली आहे.यामीने विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती काबिल, बाला, सनम रे, अ थर्सडे या चित्रपटातही झळकली होती. उरी चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता यामी लॉस्ट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच ओह माय गॉड या चित्रपटात यामी अक्षय कुमारसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने