योगेशचा राग हाताबाहेर! घरात तोडफोड, मेघावर हल्ला..

मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता तिसऱ्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याचे वेध सर्वांना लागले आहे. त्यासाठी एक भन्नाट कॅप्टीन्सी कार्य बिग बॉस ने सर्वांना दिले आहे. या टास्कच्या दरम्यान पण खूप मोठा राडा होणार आहे. योगेश आणि मेघा यांनी हा राडा घातला आहे.


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य. कार्या दरम्यान शाब्दिक चकमक, वादावादी, भांडणं, मारामारी हे आपण बघत आलो आहोत. सदस्यांना बऱ्याचदा त्यांच्या रागावर नियंत्रण राहात नाही आणि ते असे काही करून बसतात कि नंतर त्यांना त्या गोष्टीचे वाईट वाटते. असंच काहीसं आज घरामध्ये होणार आहे.

इतर सदस्यांशी वाद घालताना योगेशचा राग अनावर झाला. मेघाताई आणि योगेशमध्ये कार्या दरम्यान वादावादी झाली. मेघा ताई म्हणाल्या, "अरे तुझं डोकं गुडघ्यात... दोन्ही गुडघ्यात आहे ते सांभाळून ठेव मेंदू तुझा... योगेशने एक शब्द खाली पडू नाही दिला, तिला तोडीस तोड उत्तर दिले. अपूर्वा म्हणाली, याचे जेवढे वयं नाहीये ना तितकं तिचं करिअर आहे. त्यानंतर योगेश आणि इतर सदस्यांमध्ये वाद झाले. यावेळी योगेशला राग अनावर झाल्याने घरातील सामानाची तोडफोड केली. खुर्ची आपटून त्यावर रंग काढला. आणि तो मेघाच्या अंगावर धावून गेला. योगेशला शांत करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पण... त्याचा राग हाताबाहेर गेला. आता पुढे काय होतंय ही आजच्या भागात कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने