Big Boss 16: 'हा तर गरिबांचा हृतिक..',गौतमला सुनावताना रॅपरच्या भडकलेल्या चाहत्यांची घसरली जीभ

 बिग बॉस १६ सुरु होऊन तीनच दिवस सरलेयत तोवर राड्यांनी धुडगूस घातलाय घरात. स्पर्धकांच्या अॅटिट्युडची सोशल मीडियावर शाळा घेतली जातेय. सध्या सोशल मीडियावर सगळ्यात ट्रेन्डिंगला आहेत बिग बॉस १६ मधील राडे. अर्चना-निम्रत यांच्यातील भांडणानंतर आता गौतम विग रॅपर एमसी स्टेनला भिडलेला दिसला. गौतम विगनं रॅपर एमसी स्टेना 'आपली ड्युटी कर' असं म्हटलं आणि रॅपरने देखील मस्करीत 'हा करीन नंतर' असं म्हटल्यानं सगळं वातावरणं पुढे तंग झालं. गौतम रॅपरच्या या मस्करीतल्या अंदाजानं भडकला आणि मग सुरु झालं दोघांमधील द्वंद्व.अर्थात गौतमनं कारण नसताना भांडण उकरुन काढलं म्हणून घरातल्यांनी देखील त्याला सुनावलं आणि स्टॅनला पाठिंबा दिला. अर्थात त्यानंतर घरातल्यांनी त्यांच्यातील वाद मिटवला आणि मग त्या दोघांनीही भांडण मिटवत एकमेकांची गळाभेट घेतली. पण घरात सगळं वातावरण निवळलं असलं तरी रॅपरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मात्र वाद छेडला आहे. रॅपरचा गौतमनं केलेला अपमान त्यांना सहन नाही झालाय.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने