राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत सुवर्णपदक

गुजरात: गुजरात येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेक राधिका आवटीला तलवारबाजीत सुवर्णपदक मिळाले. याआधी तिने रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत फॉइल प्रकारात सुवर्णपदक पटकावून कतार (दोहा) येथील फॉइल ग्रँड प्रीक्‍स स्पर्धेसाठी तसेच ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती.

सांगलीत असलेल्या राधिका प्रकाश आवटी हिने गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळकडून खेळताना तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेतील हे सलग चौथे सुवर्णपदक ठरले आहे. अकिवाट (ता. शिरोळ) हे राधिकाचे मूळ गाव आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली येथे झाले आहे. सध्या ती केरळ येथे ‘साई’ प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. कसून सरावाच्या जोरावर तिने तलवारबाजी स्पर्धेत मोठी मजल मारली. २०२० साली वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. तिची ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड झाली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने