अंधेरी पोटनिवडणुकीत ट्वीस्ट वाढला; पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

 मुंबई : ठाकरे आणि शिंदे गटातील पक्षचिन्हाबाबतच्या वादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होणार होती पण शिवसेना आज पुरावे सादर करणार असून ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट वाढला आहे. आज पक्षचिन्हाबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात होणार होती पण शिवसेनेला पुरावे सादर करण्याची आज शेवटची तारीख असल्यामुळे शिवसेना आज फक्त पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे ही सुनावणी आज होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने