मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकीवर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह…”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या धमकीची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह इतर बाबींवर गृहविभागाची नजर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती. चौकशीअंती त्याची सुटका करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने