केदारनाथ हिमस्खलनानंतर उत्तराखंड भूकंपाने हादरले

 डेहराडून- हिमस्खलनाच्या घटनेला २४ तास होण्यापूर्वीच आज सकाळी उत्तराखंड भूकंपाने हादरले. उत्तरकाशीत झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात जीवित आणि वित्तहानीचे वृत्त नाही. दरम्यान, बद्रीनाथ मंदिराच्या सिंहद्वाराजवळच्या भिंतीला तडे गेल्यामुळे स्थानिक आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

केदारनाथच्या चौराबाडीत शनिवारी हिमस्खलन झाले. गेल्या १० दिवसात हिमस्खलनाची घडलेली ही तिसरी घटना होती. त्यामुळे भाविक आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असतानाच आज सकाळी केदारनाथ आणि परिसरात भूकंप झाला. त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडले. त्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र हिमस्खलनानंतर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूगर्भ हालचालींचा अभ्यास केला जात आहे. बद्रीनाथ मंदिराच्या सिंहद्वाराजवळ भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे कोणताही धोका नसला तरी त्याची पाहणी करून दुरुस्ती केली जाणार आहे, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने