आता मोबाईल नंबरशिवाय वापरता येणार WhatsApp! ‘या’ स्टेप्स वापरून लगेच करा सुरूवात

 मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपण कितीही व्यस्त असलो तरी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहतो.चॅटिंग, कॉल, व्हिडीओ कॉल, व्हॉइस नोट, फोटो शेअर करणे, व्हिडीओ शेअर करणे असे अनेक फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहेत.पण जर एकापेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरायचे असेल तर आपल्याला मोबाईल नंबरची गरज भासते. कारण व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडण्यासाठी मोबाईल नंबरची गरज असते

पण आता मोबाईल नंबरशिवाय व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडता येणार आहे. काय आहे ही ट्रिक जाणून घ्या.व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरू करण्यासाठी एका ॲक्टिव्ह नंबरची गरज असते. पण हा नंबर मोबाईलचाच असावा अशी अट नसते, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल नंबरशिवाय व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडायचे असेल तर तुम्ही लँडलाइन नंबर वापरू शकता.लँडलाइन नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरू करण्यासाठी सर्वात आधी फोनवर किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल करा.त्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यू (Agree and Continue) हा पर्याय निवडा. नंतर तिथे आलेल्या पर्यायांमध्ये लँडलाइन नंबर आणि कंट्री कोड टाका.


यानंतर व्हेरिफिकेशन एसएमएस दिसेल, त्यामध्ये ‘कॉल मी’ पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर लँडलाइन नंबर वर एक कॉल येईल ज्यामध्ये व्हेरिफिकेशन कोड सांगितला जाईल.हा ६ अंकी कोड दिलेल्या पर्यायामध्ये टाका, अशाप्रकारे लँडलाइन नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरू होईल. या प्रक्रियेमध्ये ॲक्टिव्ह नंबरचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच लँडलाइन नंबरबरोबर वापरला जाणारा कोडदेखील वापरायचे लक्षात ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने