Adipurush Teaser: 'असा कुठं हनुमान असतो का?' निर्मात्यांना BJP च्या गृहमंत्र्यांची 'तंबी'

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे आदिपुरुषच्या निर्मात्यांवर चांगलेच भडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आदिपुरुषच्या टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र ज्याप्रकारे ऐतिहासिक पात्रांची मांडणी केली आहे ती अनेकांना खटकली आहे. त्यावर आता मिश्रा यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजीही व्यक्त केली आहे. हनुमानजी यांचे वस्त्र हे चामड्याचे दाखवण्यात आले आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.कुठल्याही प्रकारे तार्किक विचार न करता लोकप्रियतेच्या हव्यासापोटी इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यावरुन भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा गांभीर्यानं विचार निर्मात्यांनी करणं गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया मिश्रा यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने