PS 1 Review: पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण निव्वळ 'रटाळवाणा'.

 PS 1 Review: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पीएस 1 या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत अशा चित्रपटानं भलेही तिसऱ्याच दिवशी दीडशे कोटींची कमाई केली असेल मात्र ज्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला असेल त्यांना किती वेळ आपला संयम राखून ठेवला हे आवर्जुन विचारावे लागेल. मुळातच टॉलीवूडचे चित्रपट जगभरातील हजारांहून अधिक स्क्रिनवर प्रदर्शित होतात. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. साहजिकच होणारी कमाईही प्रचंड असते. यातुलनेत बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रिन्स या तुलनेनं कमी आहेत.साऊथचा विशेषत जेव्हा एखादया प्रसिद्ध अभिनेत्याचा, दिग्दर्शकाचा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडत त्यात ऐश्वर्या बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षकांसमोर दिसणार होती. मोठी स्टारकास्ट घेऊन मणिरत्नम यांचा पीएस 1 चा प्रयोग काही अंशी यशस्वी झाल्याचे दिसून येते.दोन भागांमध्ये पीएस 1 विभागलेला आहे. त्याचा पहिला भाग आता प्रदर्शित झआला आहे. अभिनेता अजय देवगणच्या आवाजात चित्रपट सुरु होतो. पीएस 1 चा पुढील भाग 2023 मध्ये प्रदर्शित होणार असून त्याची उत्सुकता आतापासूनच प्रेक्षकांना लागली आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने