Avalanche : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 20 गिर्यारोहक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरु

 डेहराडून : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली असून यामध्ये २० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. द्रोपदी डंडा 2 पर्वत शिखरावर ही दुर्घटना घडली असून अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहिम राबवली जात आहे. (Avalanche in Uttarakhand fears 20 trapped Rescue operation started)या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करुन माहिती दिली. तसेच बचाव मोहिमेबाबत माहिती देताना म्हटलं की, हिमस्खलनात अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांकडून वेगानं दिलासा आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच भारतीय हवाई दलानं दिलासा आणि बाचाव कार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने