दोन तास भाषण करून काही होत नाही; पेडणेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : काल झालेल्या दसरा मेळाव्यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे सुपुत्र आहेत एवढं तरी मानत आहात का? असा सवलही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. ‘जो उठाव झाला अगदी मे पासून ते कालच्या दिवसापर्यंत की शिवसेना संपली, पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की जे गेले त्याने काही होत नाही’असंही पेडणेकर म्हणाल्यात. दसरा मेळाव्याच्या सभेनंतर किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या स्टेजवर चैतन्य होतं. शिंदेंनी 2 तास भाषण केलं तरी काही फरक पडत नाही. शिंदेंच्या भाषणावेळी लोकं उठून गेले.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने