आज राज्यात चार मेळावे; उत्सुकता शिगेला

मुंबई: आज दसरा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. गेल्या महिन्याभरापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. शेवटी तो दिवस आला आहे. बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दुसरीकडे आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या तीन्ही दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने