Sport : मयुरीची पदकांची हॅटट्रिक

 अहमदाबाद : राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागी भारतीय संघाची सदस्य खेळाडू मयुरी लुटेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दमदार पदार्पण करताना पदकांची हॅटट्रिक साजरी केली. तिने सोमवारी टीम स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट मयुरी लुटे, शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरे यांनी टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासह महाराष्ट्राच्या नावे सायकलिंगमध्ये तिसऱ्या पदकाची नोंद झाली.सायकलिंगमधील थ्री लॅपच्या या प्रकारात महाराष्ट्र संघाने ५०३ गुणांची कमाई केली. यातून मयुरीला स्पर्धेत तिसरे पदक आपल्या नावे करता आले. आता तिच्या नावे वैयक्तिक दोन पदकांसह एका सांघिक पदकाचा समावेश आहे. तिने दोन सुवर्ण आणि ब्राँझपदक जिंकले आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने