North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट

 सियोल : उत्तर कोरियानं (North Korea) आज (मंगळवार) पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (Ballistic Missile) चाचणी घेतली. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं आपल्या पूर्व किनारपट्टीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागलं आहे.उत्तर कोरियानं टोकियोवर (Tokyo) बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपाननं आज आपल्या रहिवाशांना आश्रयस्थान सोडण्याचं आवाहन केलं. क्योडो न्यूजनुसार, सरकारनं मंगळवारी पहाटे एक इशारा जारी करून जपानच्या उत्तरेकडील मुख्य बेट, होक्काइडो आणि ईशान्य प्रांत आओमोरी येथील रहिवाशांना घरात राहण्याचं आवाहन केलंय. क्षेपणास्त्र डागल्याच्या वृत्तानंतर जपान सरकारनंही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलंय. किम जोंग उनच्या (Kim Jong Un) देशानं एका आठवड्यात ही पाचवी क्षेपणास्त्र चाचणी केलीय.अमेरिका (America) आणि दक्षिण कोरियाच्या (South Korea) लष्करी सरावानंतर उत्तर कोरियानं एका आठवड्यात इतक्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांनी याआधीच दोन्ही देशांना सराव न करण्याचा इशारा दिला होता. हा लष्करी सराव अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झाला. नौदल दलांसह हा त्रिपक्षीय पाणबुडीविरोधी सराव होता. दरम्यान, जेव्हा-जेव्हा उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी घेतं, तेव्हा जपान आणि दक्षिण कोरियासाठी चिंतेचा विषय बनलेला असतो. यातील बहुतांश क्षेपणास्त्रं जपानच्या समुद्राला लक्ष्य करतात.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने