America : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'या' वृत्तवाहिनीवर चांगलेच भडकले; थेट मानहानीचा गुन्हा केला दाखल

 अमेरिका: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांनी सोमवारी CNN विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. खटला दाखल करण्यासोबतच ट्रम्प यांनी केबल टेलिव्हिजन न्यूज नेटवर्ककडून (CNN) 47 कोटी 50 लाखांची नुकसान भरपाईचीही मागणी केलीय.ट्रम्प यांनी सीएनएनवर त्यांच्याविरोधात प्रचार करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या फ्लोरिडा जिल्हा न्यायालयात (Florida District Court) गुन्हा दाखल केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या खटल्याशी संबंधित 29 पानांच्या दस्तऐवजात लिहिलं की, सीएनएन बऱ्याच काळापासून मला लक्ष्य करणाऱ्या बातम्या कव्हर करत आहे. सीएनएननं माझी बदनामी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मी 2024 मध्ये पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांना समजलं आहे, त्यामुळं माझ्याविरुद्ध कट म्हणून खोटं पसरवलं जात आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने