गुजरात: पुढच्या महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा ही देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरली आहे. नुकतीच, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, जडेजाची पत्नी रीवाबा हिचे तिकीट पक्के केले आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिला जामनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
रिवाबाने 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी तिने जामनगर उत्तरमधून तिकीट मागितल्याची चर्चा होती. सध्या इथून भाजपाचेच धर्मेंद्रसिंह जाडेजा आमदार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून इथे भाजपाची सत्ता आहे. भाजपा यावेळी सुद्धा आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.