आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा दिलाय पण...; जयंत पाटलांनी केलं स्पष्ट

ठाणे: रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली यावेळी त्यांनी आधीचे व्हिडिओ देखील लावला आहे.यावेळी जयंत पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा तयार ठेवला आहे. परंतु ते आधी शरद पवार यांची भेट घेणार आहेत त्यानंतर चर्चा करून ठरवून निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यांना राजीनामा देण्यापासून आम्ही थांबवलं आहे. त्यांना समजावण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपण न्यायाची लढाई लढू असंही पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये कलम ३५४ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. काल नेमकं काय घडलं त्याचाही घटनाक्रम सांगितला. अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करणं चुकीचं असल्याचं पाटील म्हणाले. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थ असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं.यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, आम्हाला काही कारण नसताना कोठडीत ठेवलं. मी सगळं मान्य करेन पण 354 हे कलम मान्य करणार नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करू नये यामुळे घर उद्ध्वस्त होतील असंही आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने