सणासुदीत येणारी ग्रहणे मानवजातीसाठी धोक्याची घंटा; स्वामी संविदानंद यांचा मोठा खुलासा

मुंबई -   या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला होणार आहे. या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण असेल. भारतात चंद्रग्रहण दिसल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असेल. हे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच देव दिवाळीला होईल. यंदा वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी झाले होते. वर्षातील महत्त्वाचा सण दिवाळीला सूर्य ग्रहण अन् त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळीला चंद्र ग्रहण. ऐन सणासुदीच्या काळात येणारी ही ग्रहणे जिवसृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे असा खुलासा नाशिक येथील महंतांनी केला आहे. नेमकं या ग्रहणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याचा परिणाम आपण सविस्तर जाणून घेऊया...


दिवाळीला ग्रहण...

08 नोव्हेंबर दुपारी 1.30 मिनीटांपासून ग्रहणाला सुरुवात होईल. चंद्र उगवताच भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6.19 वाजता संपेल. 08 नोव्हेंबर मंगळवारी होणारे हे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण देशात आणि जगात दिसणार आहे. हे ग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल. 15 दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल, त्यापूर्वी 25 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते. याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती नाशिक येथील कैलास मठ अधिपती श्री स्वामी संविदानंद सरस्वती यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

...हे कलियुग आहे

स्वामी संविदानंद सांगतात, भौगोलिक दृष्ट्या ग्रहण हे दरवर्षी येत असतात. हा तर निसर्गाचा एक चमत्कार आहे. मात्र हे कलियुग आहे. आणि कलियुगात देवतांच्या उत्सवाच्या काळात ग्रहण येणे काही चांगल नाही. या काळात येणारी ग्रहणे ही आपत्तीची संभावना असल्याचे संकेत सुचित करतात. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने अत्यंत काळजीपुर्वक आपली वाटचाल ठेवली पाहीजे. यासह आचरण शुद्ध ठेवून ग्रहणकाळातील महत्त्वपूर्ण नियमांचे पालन केले पाहीजे.

ग्रहण काळात करावी ही कर्म

ग्रहण काळ हा उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या ग्रहण काळात जास्तीत जास्त प्रमाणात इष्ट देवतेची उपासना, जप-तप, नामस्मरण, पुजा, अनुष्ठान, पुनश्चरण, वाचन आदी धार्मिक तथा मन शुद्धी करणारी कर्मसिद्ध कर्मे करावी. ग्रहण काळात नदीच्या पाण्यात स्नान केल्यास अधिक लाभ होतो असे स्वामी संविदानंद म्हणाले.

ही कामे केली तर ग्रहणाचा त्रास संभावतो

ग्रहण काळ हा जरी शुभ मानला जात असला तरी काहींना या काळात त्रास होतो. मात्र तो त्रास काही विशिष्ट लोकांनाच होतो. ते आपण जाणून घेऊ. धर्म शास्त्रात ग्रहणाचे काही नियम सांगितले आहे. यात ग्रहण काळात सात्विक आहार ठेवणे, आचरण शुद्ध ठेवणे, अशुभ विचार मनात न ठेवणे, झोपी न जाणे असे नियम सांगितले जातात. जे लोक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना मात्र ग्रहण काळाचा त्रास होईल. एकुणच काय तर या ग्रहण काळात जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल, मग ते चांगले कर्म असो कि वाईट कर्म असे स्वामी संविदानंद सांगतात...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने