निमृत कौरच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसमध्ये एंट्री? लोक म्हणताय, ‘बिचारा अब्दु’

मुंबई : बिग बॉस हा शो सध्या रंगात आला आहे. टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस 16 ने देशभरात चर्चेत आहे. या शोमध्ये बहुतेक टीव्ही सेलेब्स चा सहभाग आहे. टिना, सुंबुल तौकीर  त्याचबरोबर टीव्ही अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया देखील या शोची स्पर्धक आहे. निम्रत शोमध्ये चांगली खेळत आहे. तिची खेळी सर्वांनाच आवडत आहे. निम्रत बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन बनली होती. ज्यामुळे तिची फॅन फॉलोविंगही खूप वाढली आहे. तिच्या आणि अब्दु रोजिकसोबतच्या मैत्रीचीही बरीच चर्चा रंगली आहे. अब्दु नेहमी तिला तू माझी चांगली मैत्रीण आहेस असं म्हणत असतो आणि त्याला घरातील इतर लोकही चिडवत असतात.दरम्यान, एक बातमी समोर की निमृत कौर अहलुवालियाचा बॉयफ्रेंड माहिर पांधी लवकरच बिग बॉस सीझन 16 मध्ये शोमध्ये प्रवेश करू शकतो. निमृत कौर अहलुवालिया ही माहिर पांधीला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. समोर आलेल्या माहिती नुसार तर माहिर, वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून, सलमान खानच्या शोमध्ये निम्रतला पाठिंबा देण्यासाठी येऊ शकते.तर दुसरी कडे सोशल मीडियावर निम्रतचा रुमर बॉयफ्रेंड माहिरच्या एन्ट्रीवर चाहते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स निर्मात्याच्या या निर्णयावर खूश असल्याचं दिसतेय तर  काहींना अब्दु रोजिकबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत. एकाने निम्रतचा बॉयफ्रेंड माहिरची वाईल्ड कार्ड एंट्री अब्दू रोजिकसाठी एक वाईट निर्णय असल्याचं म्हटंलय तर त्यावर मजेदार मीम शेअर होत आहे.

बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडमध्ये टीना दत्तामुळे शालीन भानोत आणि एमसी स्टेन यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. याभांडणात सुंबुल ही उतरली, त्यामुळे टीनासोबतचे त्यांच्या नात्याच दुरावा आल्याचं दिसतंय. 'फ्रायडे का वार'चा एपिसोड या चौघांभोवती फिरत होता.  शालीन, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यातील भांडणानंतर  घर दोन गटात विभागलं गेलं आहे. शालीन भानोतला प्रियंका आणि अंकित सपोर्ट करत आहेत. दुसरीकडे साजिद खान, टीना दत्ता म्हणतात की बिग बॉस बघून कारवाई करतील. त्यामूळे बिग बॉस काय निर्णय घेतो याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने