तुम्ही देश पाहा, आम्हाला गुजरात द्या" आपच्या भावी मुख्यमंत्र्यांची PM मोदींकडे मागणी

गुजरात :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. गुजरातमध्ये ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, गढवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गुजरात द्या अशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी आपचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव ईशुदान गढवी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी गुजरात देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे.काय म्हणाले ईशुदान गढवी ?

ईशुदान गढवी मोदींसंदर्भात बोलताना गुजरातमधील अनेक घटनांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांचा सन्मान अमेरिकेच्या पणाला लागला आहे. गुजरातमध्ये आप सरकार आले तर पंतप्रधान मोदी यांचा सन्मान राहिल. खरतंल लोकांनी त्यांना बदनाम केलं आहे. पेपर लीक होत आहे.करप्शन होत आहे. पुल तुटला आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोदी तुमची प्रतिमा खराब होत आहे. विदेशातदेखील...रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाहिलं तर काय म्हणतील.

तुम्हाला तुमची प्रतिमा वाचवायची असेल तर पंतप्रधानांनी 'आप'ला सरकार स्थापन करण्यात मदत करावी. गुजरातमध्ये त्यांच्याच माणसांनी त्यांची बदनामी केली आहे. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातला ते आवडत होते. ज्या क्षणी ते पंतप्रधान होण्यासाठी निघाले, त्या क्षणी गुजरातमधील त्यांच्याच नेत्यांनी गुजरातचे नाव खराब केले आहे. मोदींना देश सांभाळायचा आहे. आम्हाला गुजरात द्या. आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ. अशी मागणी ईशुदान गढवी यांनी यावेळी केली."मी मोदींना आश्वासन देऊ शकतो की त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी 'आप'ला मदत करावी, कोणताही पेपर फुटणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही... जर भ्रष्टाचार समोर आला तर मंत्री तुरुंगात जातील," अशी ग्वाही गढवी यांनी देत कृपया आम्हाला एकदा मदत करा. अशी विनंतीदेखील केली .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने