"सावरकर, लोकमान्य टिळकांप्रमाणे मीही जेलमध्ये एकांतात होतो"

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल तब्बल १०३ दिवसांनी जेलमधून जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर आज सकाळी पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले जेलमधले काही अनुभव सांगितले आहेत. तसंच त्यांनी आपण सावरकर, टिळक यांच्याप्रमाणे जेलमध्ये राहिलो असल्याचंही सांगितलं.माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपले जेलमधले अनुभव सांगितले आहेत. मला वाटलेलं लोक मला विसरतील, पण कालपासून जे स्वागत पाहतोय, त्यावरुन तसं वाटत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, "लोकांना वाटतं, जेलमध्ये राहतो म्हणजे मजेत राहत असेल. पण जगातलं कोणतंही जेल मजा नसते. जेलमध्ये राहणं फार अवघड आहे.माझी तब्येत जेलमध्येही खराब होती, आत्ताही खराब आहे. तिथे भिंतींशी बोलावं लागतं, एकांतात बोलावं लागतं. मी विचार करायचो की सावरकर १० वर्षांपेक्षा जास्त कसे राहिले असतील, टिळक कसे राहिले असतील, वाजपेयींपासून अनेक लोक कसे राहिले असतील. पण जे राजकारणात असतात, त्यांना कधी ना कधी जेलमध्ये जावंच लागतं. "

यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, "राज ठाकरेंनी एका भाषणात माझ्यावर टीका करताना सांगितलं होतं की आता संजय राऊतांना ईडीकडून अटक होणार. आता राऊतांनी स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी. हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती. आपण शत्रूबद्दलही अशी भावना करू नये. सावरकर, टिळक ज्याप्रमाणे एकांतात होते, त्याप्रमाणे मीही एकांतात होतो. माझी अटक राजकीय होती. मी माझा एकांत सत्कारणी लावला आहे. "

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने