'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्यात; धर्म बदलून..

मुंबई - 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यावर काही तासातच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा टीझर शेयर केला आणि चर्चाना उधाण येऊ लागले. या टीझर मध्ये दाखवलेल्या दृश्यांची आणि आशयाची सोशल मिडियावर बरीच चर्चा आहे. यामधून बरेचवादग्रस्त विधान करण्यात आले आहे. त्यामुळे आता 'द केरळ स्टोरी' वादाच्या केंद्रस्थानी आहे.केरळमधील धर्मांतर आणि दहशतवादी घटनांची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या टीझरने प्रेक्षकांना हादरवून सोडले आहे आणि सोशल मीडियावर या चित्रपटाबाबतही वाद सुरू आहे.'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. टीझरमध्ये अभिनेत्री बुरखा घातलेली दाखवण्यात आली आहे. धर्मांतराच्या घटना मांडणाऱ्या या चित्रपटाबाबतही सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टीझरच्या सुरुवातीला असे दाखवले आहे की,अदा शर्मा सांगताना दिसत आहे की, ती हिंदू ते मुस्लिम कशी झाली आणि शालिनी उन्नीकृष्णनला फातिमा बा बनवून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले. टीझरमध्ये शालिनीसोबतच केरळ राज्यातून गायब झालेल्या ३२ हजार महिलांसोबत अशाच एका घृणास्पद कटाचा खुलासा करणारी ही कहाणी आहे.चित्रपटाचा टीझर खूपच भीतीदायक आहे, हे पाहून सोशल मीडियावरील प्रेक्षक दोन गटात विभागले गेले आहेत. एकीकडे लोक चित्रपटाचे कौतुक करत आहेत आणि धर्मांतराला गंभीर मुद्दा म्हणत आहेत, तर काही लोक निर्माते आणि चित्रपटाविरोधात प्रश्न उपस्थित करत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की "चित्रपट निर्मात्यांनी केरळमध्ये गायब झालेल्या मुलींचे खरे आकडे दाखवावे" तर एका युजर्स ने लिहिले आहे की, " या चित्रपट निर्मात्यांला पाठवा दहशतवादी संघटनांकडे, केरळ सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.." अदा शर्माच्या या चित्रपटाच्या रिलीज तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टबद्दल कोणतेही अपडेट नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने