मराठी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मुळे नावारुपाला आलेला गायक करतोय शेती, भात कापणीचा फोटो शेअर करत म्हणाला…

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी यामधील पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत आजही सगळ्यांच्या आठवणीत आहेत. हे पाचही जणं संगीत क्षेत्रात उत्तम काम करतात. यामधील एक गायक सध्या शेती कामांमध्ये रमला आहे.गायक प्रथमेश लघाटे सध्या आपल्या कामामधून ब्रेक घेत आपल्या कोकणातील गावी पोहोचला आहे. यादरम्यानचे काही फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. तो आपल्या घरच्या शेतामध्ये भात कापणी करत आहेत.प्रथमेशने गावाकडचे फोटो शेअर करत म्हटलं की, “नमस्कार मंडळी, माझ्या आजोळी, चाफेड गावात मामाबरोबर भातकापणीचा अनुभव वाट्याला आला. त्याचाच एक नवाकोरा व्लॉग उद्या तुमच्यासाठी घेऊन येतो आहे.” त्याच्या या फोटोला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

भात कापायला आमच्याकडेही ये, खूप भारी, शेतकरी दादा अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी त्याचे हे फोटो पाहून केले आहेत. प्रथमेशच्या आवाजाचे हजारो चाहते आहेत. मराठी चित्रपटांसाठीही त्याने काम केलं आहे. सध्या तो आपल्या कामामधून वेळ काढत निसर्गाचा आनंद घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने