कोल्हापुरातून 19 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; 'लव जिहाद'चा संशय, पोलिसांकडून शोध सुरु

 कोल्हापूर : सध्या देशभरात 'लव जिहाद'शी संबंधित प्रकरणं खूप गाजत आहेत. महाराष्ट्रातूनही अशी प्रकरणं समोर येत आहेत. कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं असल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी कोल्हापुरातील  जुना राजवाडा पोलिस ठाण्यात  संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, पोलिस कारवाई करण्यात पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांचा काळजीपूर्वक तपास सुरु

या घटनेला 19 दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप मुलीचा शोध लागलेला नाहीय. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजावाडा पोलिसांना जाब विचारला आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. या प्रकरणातील मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. प्रकरण नाजूक असल्यामुळं पोलिस काळजीपूर्वक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने