पॉर्न स्टार मार्टिनीला गुगलवर करण्यात आले सर्वाधिक वेळा सर्च; कारण...

मुंबई : कोणत्याही विषयाबाबत माहिती मिळण्यासाठी जगभारातील करोडो लोक आज गुगलची मदत घेतात. येथे अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मात्र, जगभरात अनेक लोक गोष्टी अशा आहेत ज्यांना सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले आहे.गुगल प्रत्येक वर्षाच्या शेवटी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध करते. अशीच एक यादी डिसेंबर २०२१ मध्ये समोर आली होती. यात वर्षभरात पॉर्न स्टार मार्टिनीबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आले.कोण आहे पॉर्न स्टार मार्टिनी ?

नाव वाचल्यानंतर तुम्हाला मार्टिनी पॉर्न स्टार असेल असे विचार आले असतील मात्र, तसे अजिबात नाहीये. खरे तर, मार्टिना हे एक पेय आहे ज्याची रेसिपी लॉकडाऊनच्याकाळात लाखो लोकांनी गुगलवर सर्च केली होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक टास्क दिले जात होते. त्यापैकीच एक टास्क होते. त्यामुळेच अनेकांनी या काळात पॉर्न स्टार मार्टिनीच्या रेसिपीबाबत सर्च केले होते.पॉर्न स्टार मार्टिनी हे क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे, याच्या नावामुळे ते अधिक लोकप्रिय आहे. 2021 मध्ये पॉर्न स्टार मार्टिनी Google वर सर्वाधिकवेळा सर्च करण्यात आली. पाककृतींच्या बाबतीत सर्च करण्यात आलेल्या गोष्टींमध्ये 6 व्या क्रमांकावर होती.

पॉर्न स्टार मार्टिनीशिवाय लोकांनी 2021 मध्ये गुगलवर मशरूमबाबतही बराच शोध घेतला. पाककृतींच्या सर्चमध्ये मशरूम एकनंबरवर होती. याशिवाय मोदकांची रेसिपीही सर्वाधिक सर्च करण्यात आली. यानंतर मेथी मटर मलाई, चिकन सूप रेसिपी आणि पालक आदी पदार्थांबाबत या काळात सर्च करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने