लागा तयारीला! पुणे पोलीस दलात ७९५ जागांवर होणार मेगा भरती

पुणे : महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्याप्रमाणात भरती प्रक्रीया सुरू असून पुणे विभागासाठी ७९५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जाणून घेऊ सविस्तर माहिती.पुणे पोलिस भरती २०२२

  • पद - पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक

  • रिक्त पद संख्या - ७९५

  • शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण

  • वयाची अट

  • खुला वर्ग - १८ ते २८ वर्ष

  • मागास वर्गिय - १८ ते ३३ वर्ष

पुण्यासाठी असलेल्या या जागांसाठी ९ नेव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच करता येणार असून याचं शुल्क खुल्या वर्गासाठी ४५० रुपये असून मागार वर्गासाठी ३५० रुपये आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://mahasarkar.co.in/pune-police-bharti-2/ या संकेतस्थळाला भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने