महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मोठी अपडेट; 'या' दिवशी होणार सुनावणी

मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आता 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. यावर अखेर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी ही २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहितीदेखील देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.राज्यातील सत्तासंघर्षावरील निर्णय पुढे गेला आहे. खरी शिवसेना कोणाची? याचा निवाडा निवडणूक आयोग करेल, असे स्पष्ट करीत बंडखोर शिंदे गटाला दिलासा दिला होता. परंतु, आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयाने कुठलेही निर्देश दिले नव्हते. अशात आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दोन्ही बाजुंकडून वेळ मागण्यात आल्याने तारीख पुढे गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने