भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात, देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम-एस प्रक्षेपित

आंध्र प्रदेश: भारताने आज अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशातील पहिले खाजगी रॉकेट 'विक्रम-एस' यशस्वीपणे आकाशात लाँच केले आहे. विक्रम-एस' रॉकेटचे नाव भारताचे महान शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतातील खाजगी क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप असल्याचे मत इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरचे (IN-SPACE) अध्यक्ष पवन गोयंका यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अशा प्रकारे खाजगी रॉकेट लाँच करणारी पहिली भारतीय कंपनी बनल्याबद्दल स्कायरूटचे अभिनंदन केले आहे. टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने