राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिन्याभरात निघणार श्वेतपत्रिका; उद्योगमंत्र्यांची घोषणा

 मुंबई : महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. प्रकल्पांवरुन सुरु झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीनं आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणतो. तसा मेगा खोटं बोलण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांबाबतची शासनाची भूमिका स्पष्ट केली. आजच्या पत्रकार परिषदेत कोणाची बाजू खोडण्याचा प्रयत्न नाही. कारण महाराष्ट्रात उद्योजकांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण तयार केलं जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे.

काल सॅफ्रन प्रोजेक्टबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार घडला. हा प्रयत्न काय आहे की, मीडियानं दीड दोन महिन्यापूर्वी ज्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या होत्या त्या खोडण्याचं काम तसेच संबंधीत कंपनी गेल्याचं सांगून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करत आहेत. काही मंडळी तर वेगवेगळ्या बातम्या, ट्विट दाखवून सांगत आहेत.त्यामुळं, वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन, सिनारमस या प्रकल्पांची खऱी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्र शासनानं उद्योगांबाबत केलेला पत्रव्यवहार, दाओसमधील बैठका तसेच याचं रेकॉर्डचा पुरावा आम्ही महाराष्ट्राला देणार आहोत, असंही यावेळी सामंत यांनी सांगितलं.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने