बिरसा मुंडा कधीही सावरकरांप्रमाणे ब्रिटिशांपुढे झुकले नाहीत - राहुल गांधी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. दलित, आदिवासी आणि गरीबांना अधिकार मिळू नयेत यासाठी भाजपा संविधानावर रोज हल्ला करत असतं, अशी टीका केली आहे. तसंच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलही विधान केलं आहे.भारत जोडो यात्रेचा आज ७० वा दिवस असून ही यात्रा काल वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. काल बिरसा मुंडा जयंतीनिमित्त राहुल गांधींनी दुपारी एक सभा घेतली. या सभेमध्ये आदिवासी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुलना केली आहे. बिरसा मुंडा आपल्या आदर्शांवर ठाम होते, असंही ते म्हणाले आहेत.

सावरकर आणि बिरसा मुंडा यांची तुलना करताना राहुल गांधी  म्हणाले, "ते (मुंडा) एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासीचं प्रतिक आहेत आणि आपल्याला मार्ग दाखवतात. भाजपाचं प्रतिक सावरकर आहेत. ते दोन तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले होते. त्यांनी दया याचिका लिहायला सुरुवात केली होती." सावरकरांनी स्वतःच वेगळ्या नावाने एक पुस्तक लिहिलं आणि आपण किती शूर आहोत, हे सांगितलं. तसंच सावरकर काँग्रेसच्या विरोधात काम करायचे आणि इंग्रजांसाठी काम करुन त्यांच्याकडून पेन्शन घ्यायचे, असंही राहुल गांधी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने