“भारत जोडो यात्रा रोखा,” शिंदे गटातील खासदाराच्या मागणीवर राहुल गांधींनी दिलं जाहीर आव्हान, म्हणाले “यात्रा रोखूनच…”

मुंबई:  काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाना आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते आज (१७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.

या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पत्र दुसऱ्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांत नाहीये. एकीकडे देशातील सर्व संस्था एकीकडे उभ्या आहेत. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीदेखील तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल याचा विश्वास नाही. युवकांनी कोठेही शिक्षण घेतलेले असले तरी त्यांना रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. मला नोकरी मिळेल असे ठामपणे सांगणारा एकही तरुण भेटलेला नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने