द्रौपदीची भूमिका केली नवरा झाला संशयी , तीन वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न...

मुंबई : महाभारत या टीव्ही शोमधून द्रौपदीची भूमिका साकारून रातोरात स्टार बनलेल्या आणि घराघरात  पोहचलेल्या रूपा गांगुली ही तिच्या काळातील सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  हिंदी आणि बंगाली टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे. पण ही गोष्ट सगळ्यांना माहीती नाही रूपा गांगुली यांना द्रौपदीचा रोल हा योगायोगाने मिळाला. महाभारतातील द्रौपदीचा रोल यासाठी अभिनेत्री जुही चावला ही पहिली पसंती होती पण जुहीने टिव्ही वर काम करण्यास नकार दिला त्यामूळे रूपाला"द्रौपदी" नावाने ओळख मिळाली.रूपा गांगुलीने १९८५ साली 'साहेब' चित्रपटातून बॉलिवूड जगतात प्रवेश केला. त्यानंतर त्या  'एक दिन आश्चर्य', 'बहार आने तक' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. मात्र, रूपा गांगुलीला बॉलिवूडमध्ये काही खास यश मिळालं नाही. तिला बंगाली चित्रपटांतून ओळख मिळाली आहे.  रूपाने बंगाली, हिंदीसह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रूपा गांगुलीही अभिनयाबरोबरच चांगली गायकही आहेत. २०११ मध्ये त्यांना अबोशेशेय या बंगाली चित्रपटासाठी बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

मात्र रूपा गांगुलीचं वैयक्तिक आयुष्य‌ खुप दुःखात गेलं. रुपा गांगुलीने एकदा एका रिअॅलिटी शोमध्ये कबूल केले की तिने लग्नानंतर अभिनय सोडला आणि पतीसोबत कोलकाता येथे स्थायिक झाली. तिचं पतीसोबत सुखी नात नव्हतं.रुपाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असत. रोजच्या भांडणातून सुटका करून घेण्यासाठी तिने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला.तिने अभिनयाच्या जगापासून दूर राहून राजकारणात करिअर करण्याचा निर्णय घेतला.  २०१५ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रूपा गांगुली २०१६  ते २०२२ पर्यंत राज्यसभेच्या सदस्या होत्या.सध्या रूपा राजकारणात खूप सक्रिय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने