शिव ठाकरेनं पुन्हा मन जिंकले! चाहते म्हणाले,“मराठी माणूस...”

मुंबई : बिग बॉस 16 शोमध्ये वाद कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. टीना दत्ता-शालीन ठाकरे आणि सुंबूल तौकीर खान याच्यातील वादही अजून मिटलेला नाही. नुकतचं सुंबुलच्या वडिलांनी तिच्याशी संवाद साधण्याची विनंती बिग बॉसला केली होती.त्यांच्या या विंनतीला मान्य करत  बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये सुंबूल आणि तिच्या वडिलांना बोलायला लावले. पण दोघेही तब्येतीबाबत कमी आणि शो, नॉमिनेशन याचं प्लॅनिंग जास्त करत असल्याचं कळल्यावर बिग बॉस चांगलाच संतापला.त्यामूळे बिग बॉसने सर्व स्पर्धकांसमोर ही गोष्ट सांगितली. सुंबुल आणि तिच्या वडिलांचं संभाषण ऐकून टीना आणि शालीन यांना राग आला आणि सुंबुलही खूप रडताना दिसली. त्यानंतर शिव तिच्याकडे गेला आणि शिवाने ज्या प्रकारे सुंबुलला सांभाळल तिची काळजी घेतली.त्याच्या वागण्यामूळे त्याने पुन्हा सर्व प्रेक्षकांच मन जिंकलय. शिवाने सुंबुलच्या डोक्यावर हात ठेवून जे केले ते फक्त खरा माणूसच करू शकतो. शिव ठाकरेंनी सुंबुलची मोठ्या भावासारखी काळजी घेतली

ट्विटरवर याबद्दल अनेक कमेंट्स करत आहे. ज्यात युजर्स म्हणत आहेत की शिवने सुंबुलची मोठ्या भावासारखी काळजी घेतली. ही गोष्ट दोघांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. त्यातच शिवच्या बोलण्याशी चाहते सहमत आहेत.त्याबद्दल युजर्सनी मराठी माणसाचं कौतुक केलय. शिव ठाकरेने  सुंबूल आणि त्यांच्या वडिलांचे समर्थन करत सांगितले की, कोणत्याही वडिलांनी आपल्या मुलीसाठी असेच केले असते. तेही त्याच्या जागी ठीक आहे. शिवचे हे मत एकल्यानंतर लोक सोशल मीडियावर शिवला पाठिंबा देत ​​आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने