आता एनआरआयसुद्धा आधारसाठी अर्ज करू शकतात?

मुंबई : आधारकार्ड हे डॉक्युमेंट भारताचा निवासी असण्याच सर्वात मोठं आणि मूलभूत डॉक्युमेंट आहे. पण एनआयआर सुद्धा यासाठी अर्ज करू शकतो का? याबाबत बराच संभ्रम आहे; UIDAI म्हणते की NRI देखील आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. भारतात पॅन कार्डपासून ते बँक खात्यांपर्यंत, प्रत्येक गोष्ट तुमच्या आधारशी लिंक आहे, ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट बनला आहे. सरकार पुरस्कृत अनेक योजनांनी त्यांच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. म्हणूनच हे डॉक्युमेंट अनिवासी भारतीयांसाठी (NRI) देखील तितकेच महत्त्वाचे आहे.पण, अनिवासी भारतीयांना ते आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात की नाही याबद्दल अनेकदा अस्पष्टता असते. UIDAI ने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केले आहे की वैध भारतीय पासपोर्ट असलेला अनिवासी भारतीय आधार कार्डसाठी अर्ज करू शकतो.याची चाचपडताळणी कोणीही UIDAI आधारच्या FAQ विभागाला भेट देऊन करू शकतो. आधार कार्ड नोंदणीबाबत NRI लोकांनी विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया NRI साठी उर्वरित भारतीय नागरिकांसारखीच आहे.

NRI आधार कार्डसाठी अर्ज कसा करू शकतो?

  • UIDAI ने NRI द्वारे आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रियेचा देखील उल्लेख केला आहे.

  • स्टेप 1: तुमच्या जवळच्या कोणत्याही आधार सेवा केंद्रात जा.

  • स्टेप 2: तुमचा वैध भारतीय पासपोर्ट तुमच्यासोबत घेऊन जा

  • स्टेप 3: नावनोंदणी फॉर्म घ्या आणि सर्व आवश्यक तपशीलांसह भरा. तुम्ही नावनोंदणी फॉर्ममध्ये भरलेले तपशील तुमच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या तपशीलांशी जुळत असल्याची खात्री करा.

  • स्टेप 4: अर्जदाराने फॉर्ममध्ये त्यांचा ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.

  • स्टेप 5: नंतर ऑपरेटरला तुमची NRI म्हणून नोंदणी करण्यास सांगा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने