शिवसेनेतल्या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार; आदित्य ठाकरेंची कबुली

मुंबई: शिवसेनेतल्या फुटीला मी आणि उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची कबुली आदित्य ठाकरेंनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी पाठीमागून वार केले, अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.मुंबईत झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते. शिवसेनेतल्या फुटीची जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांना विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले, "मी त्याची जबाबदारी घेतो. मी आणि माझे वडील उद्धव ठाकरे आम्ही जबाबदार आहेत या फुटीला. कारण आम्ही त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आपलं मानलं.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, "आम्हाला वाटलं की ते आमच्या सोबत राहतील. गेल्या ४०-५० वर्षांत मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकाससारखं महत्त्वाचं खातं दिलं. जे इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षातल्या नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक झाली."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने