नवले पूल अपघातप्रकरणी फरार चालकाचे नाव आले समोर, गुन्हा दाखल

पुणे : साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली असून, हा अपघात कुणाच्या  निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले होते.

तर नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक मनीलाल यादव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा चालक उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, तो सद्या फरार असून काल रात्री झालेल्या अपघातप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताला कारण ठरलेल्या AP 02 TE 5858 ट्रकचा चालक मणीराम छोटेलाल यादव रा. मध्य प्रदेश हा सध्या फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने