श्रद्धा वालकरचा मित्र असलेल्या टी.व्ही अभिनेत्याचा शॉकिंग खुलासा, म्हणाला..

मुंबई : आफताब अमीन पूनावालाने गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या केल्याचं पोलिसांसमोर कबूल केले आहे,पण ही केस तरिही गुंतागुंतीची बनत चालली आहे. आफताब आणि श्रद्धा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यावर्षीच दोघं दिल्लीला शिफ्ट झाले होते. महरौली मध्ये ते एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दोघांमध्ये नेहमीच भांडणं व्हायची,पण १८ मे ला जेव्हा दोघांमध्ये लग्न करण्याच्या मुद्दयावरनं भांडण झालं तेव्हा आफताबनं रागाच्या भरात तिची हत्याच केली. त्यानंतर त्यानं श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. जेणेकरुन त्याला कोणी पकडू नयेआता या केसमध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. बोललं जात आहे की आफताबची नार्को टेस्ट केली जाणार आहे. यादरम्यान आता टी.व्ही अभिनेता इमरान नाजिर खाननं काही शॉकिंग खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर त्याची मैत्रिण होती. इमरानच्या म्हणण्यानुसार श्रद्धा वालकरने त्याला जवळपास दोन वर्ष आधी सांगितलं होतं की तिचा बॉयफ्रेंड ड्रग्जचे सेवन करतो आणि तिला त्याची ही सवय सोडवायची आहे. इमरान जवळ यासाठी श्रद्धानं मदत मागितली होती.

इमरान नाजिर मुंबई बाहेर आपल्या होमटाऊनला म्हणजे काश्मिरला गेला होता. त्याला श्रद्धाच्या हत्येविषयी काहीच माहीत नव्हतं. जेव्हा सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी तो पुन्हा मुबंईला परतला तेव्हा टी.व्ही वर त्याने श्रद्धा वालकरच्या हत्येची बातमी पाहिली,आणि त्याला मोठा धक्का बसला. एका पत्रकारासोबत त्यानं साधलेल्या संवादा दरम्यान इमरान नाजिर म्हणाला आहे,''मी श्रद्धाला ओळखायचो,फेब्रुवारी २०२१ मध्ये तिनं मला भेटायला बोलावलं होतं. तिनं मला सांगितलं होतं की तिचं आयुष्य अडचणीत सापडलंय. श्रद्धाच्या म्हणण्यानुसार तिच्या बॉयफ्रेंडला ड्रग्जचे व्यसन लागले होते,गेल्या २ ते ३ वर्षांपासून तो ड्रग्ज घेत होता. आफताबचं हे व्यसन सोडवण्यासाठी तिनं मला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राविषयी विचारलं होतं. तिला वाटत होतं की आफताब त्या केंद्रात जाऊन ठीक होईल''.''मला श्रद्धानं सांगितलं होतं की तिचा अशा कुठल्या व्यसन मुक्ती केंद्राशी काही कॉन्टॅक्ट नाही,किंवा त्याविषयी फारशी माहिती नाही तेव्हा यासंदर्भात मी तिची मदत करावी''. माहितीसाठी थोडं इथे नमुद करतो की टी.व्ही अभिनेता इमराननं अनेक तरुणांना ड्रग्जच्या व्यसनातून मुक्त व्हायला मदत केली आहे. त्यानं देखील श्रद्धाला वचन दिलं होतं की तो तिची मदत करेल. पण श्रद्धाने दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर इमरानशी काहीच संपर्क साधला नाही.इमरान नाजिर खान टी.व्ही च्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये दिसला आहे. त्यानं कलर्स वाहिनीवरील 'गठबंधन', 'अलादीन: नाम तो सुना होगा'(सब टी.व्ही),'मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह'(स्टार प्लस),'हमारी बहू सिल्क'(झी टी.व्ही),'मॅडम सर'(सब टी.व्ही) सारख्या अनेक मालिकांमध्ये इमरानने काम केले आहे. इमरान प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे आणि व्हिडीओ ब्लॉगर पण आहे. त्याने तामिळ,तेलुगु,मल्याळम आणि कन्नड सिनेमातून काम केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने