अफझल खानच्या कबरीजवळ आढळलेल्या आणखी तीन कबरी कुणाच्या? नवी माहिती समोर

साताराः परवा शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र ही कारवाई सुरु असतांना तिथे आणखी तीन कबरी आढळून आलेल्या आहेत. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिलाय.१९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. गुरुवार, दि. १० नोव्हेंबर रोजी अफझल खानाच्या कबरीजवळ झालेले अतिक्रमण हटवण्यात आले. यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली होती. मात्र या कारवाईदरम्यान अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आलेल्या आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुतेश जयवंशी यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. यासंबंधी आणखी माहिती घेण्याचं काम महसूल प्रशासन करीत आहे.



अफझल खानाच्या समाधीजवळ सय्यद बंडाची कबर असल्याचं सांगितलं जातंय. पंरतु १९१६मध्ये द. बा. पारसनिस यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतः काढलेले फोटो छापण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फक्त अफझल खानाची कबर दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे १९१६ नंतर तिथं आलेली कबर नेमकी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होतोय. यासह इतर दोन कबरीही कुणाच्या? याची उत्तरं शोधण्याचं काम प्रशासन करीत आहे.अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमध्ये इतर कबरींना धक्का लावण्यात आलेला नाही. त्या कबरींभोवती जाळी लावण्यात आलेली आहे.

दरम्यान, अफझल खान स्मारक समितीच्या वतीनं ॲड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात  गुरूवारी याचिका दाखल केली. सरन्यायाधिशांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आलं. कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी, असं आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने