मुंबई: साऊथ सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या तर 'दृश्यम 2' मुळे ती चर्चेत आहे. पण त्यासोबतच रोमॅंटिक अंदाजामुळे देखील तिच्याविषयी बोललं जात आहे. श्रिया सरन नेहमी पब्लिकसमोर नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते. आता अभिनेत्री चक्क एअरपोर्टवरच नवऱ्यासोबत रोमान्स करु लागल्याची बातमी जोरदार व्हायरल झाली आहे.अभिनेत्री श्रिया सरनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एअरपोर्टवर आपल्या पतीसोबत दिसत आहे. आणि भलतीच खूश देखील आहे. श्रिया आपल्या पतीसोबत रोमॅंटिक अंदाजात दिसल्यावर पापाराझींनाही त्यांच्या कॅमेऱ्यात तिला बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे मग काय श्रियाच्या प्रेमाचा रंगही बहरत गेला अन् चक्क तिनं कॅमेऱ्यासमोरच नवऱ्यासोबत लीपलॉक केलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. कितीतरी नेटकरी यावरनं तिला खूप काही सुनावताना दिसत आहेत.
एका नेटकऱ्यानं कपलवर भडकत लिहिलं आहे, 'कसं वागतायत दोघे? घरात जागा कमी पडली का,जे कॅमेऱ्यासमोर शो ऑफ करतायत', दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे, 'ही अशी हरकत करायला कॅमेऱ्यासमोर जास्त चांगलं वाटतं का? ',तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'कॅमेऱ्यासमोर दुसरी कुठली पोझ तुला सुचत नाही का?'श्रिया सरन विषयी बोलायचं झालं तर सध्या ती 'दृश्यम 2' चं यश एन्जॉय करत आहे. सिनेमानं बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी सिनेमानं २१.५९ करोड कमावले होते. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलंच डोक्यावर उचलून धरलं आहे. सिनेमात तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत.