हल्ला केल्यास उत्तर कोरिया अणुबॉम्बनं देश उडवून देईल; किम जोंग उनची अमेरिकेसह मित्र राष्ट्रांना धमकी

उत्तर कोरिया: उत्तर कोरियाचा  हुकूमशहा किम जोंग उन  यानं पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलीय. किम जोंग उननं अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना इशारा दिलाय. अमेरिकेनं  हल्ला केल्यास उत्तर कोरियाही अण्वस्त्र हल्ला करेल, असं किमनं म्हटलंय.सततच्या धमक्यांना उत्तर कोरिया नक्कीच प्रत्युत्तर देईल, असंही त्यानं सांगितलंय. शनिवारी क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी किम जोंग स्वतः उपस्थित होता. यावेळी त्यानं अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांनाही धमकी दिलीय. एक दिवस आधी उत्तर कोरियानं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) डागलं होतं. हे क्षेपणास्त्र समुद्राच्या दिशेनं डागण्यात आलं.अमेरिकेची दबावाची रणनीती आणि दक्षिण कोरिया-जपानच्या प्रदेशातील त्यांच्या वृत्तीला प्रत्युत्तर म्हणून हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं उत्तर कोरियाच्या लष्करानं  सांगितलं. क्षेपणास्त्र डागण्यावेळी किम जोंग उन आपली मुलगी आणि पत्नीसह उपस्थित होता. या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणप्रसंगी किम जोंग उन म्हणाला, 'अमेरिका आणि त्यांचे मित्र देश चिथावणी देण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. त्यामुळं उत्तर कोरियाला आपल्या तयारीला वेग द्यावा लागला आहे. उत्तर कोरियावर अण्वस्त्र हल्ला झाला तर त्याचं उत्तरही अण्वस्त्रांनीच दिलं जाईल, असंही त्यानं म्हटलंय.

उत्तर कोरियानं Hwasong-17 ICBM क्षेपणास्त्र सोडलं. यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी याच क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु, चाचणी अयशस्वी ठरली होती. देशाला अण्वस्त्रांच्या बाबतीत सक्षम आणि शक्तिशाली बनवण्यासाठी ही चाचणी केली जात असल्याचं उत्तर कोरियाच्या लष्करानं म्हटलं आहे. हे क्षेपणास्त्र 1,000 किमी पर्यंत गेलं आणि उंची 6,041 किमी होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने