'स्वदेशी बनो' म्हणत अ‍ॅमेझॉन देतोय आपल्या भाषेत खरेदी करण्याची संधी

मुंबई : अ‍ॅमेझॉन ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटवरून, लोक घरी बसून दररोज किती उत्पादने ऑनलाइन खरेदी करतात हे माहित नाही. भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये अ‍ॅमेझॉनची सुविधा उपलब्ध आहे.या वेबसाइटवर आपल्या युजर्सला फक्त भाषा या कारणाने कोणत्याही त्रासाला सामोरे जायला नको म्हणून आता या कंपनीने नवीन फिचर्स लॉन्च केले आहेत. 



तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन आपल्या भाषेत अ‍ॅमेझॉन साईट वरून शॉपिंग करू शकतात.अ‍ॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक देशांच्या भाषा यात अड केल्या आहे. त्यात भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या 'हिंदी' भाषेसोबत इतरही भाषेंचाही समावेश आहे.आजच्या काळात सर्वच वर्गातील लोक अ‍ॅमेझॉन वरून खरेदी करत आहेत.भारतातही अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना इंग्रजी वाचण्यात आणि लिहिण्यात अडचण येते. अशा वापरकर्त्यांसाठी, अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर अनेक प्रादेशिक भाषा आहेत. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या पसंतीची भाषा वापरून, अ‍ॅमेझॉन वरून खरेदी करू शकतात.

तुम्हालाही अ‍ॅमेझॉनवर इंग्रजीऐवजी हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेत खरेदी करायची असेल, तर खालच्या स्टेप्स फॉलो करा.

१. सर्व प्रथम अ‍ॅमेझॉन वेबसाइट उघडा.

२. आता लॉगिन करा आणि खालच्या बाजूला असलेल्या तीन लाइन्स असलेल्या Menu वर क्लिक करा.

३. आता ओपन झालेल्या स्लाईडला स्क्रोल करत सर्वात शेवटी Settings वर क्लिक करा.

४. Settings मध्ये Country & Language ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

५. आपल्या हव्या असलेली भाषा निवडा आणि मग save वर क्लिक करा.

     तुम्हाला वेबसाईट वर तुमची भाषा दिसेल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने